चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., चंद्रपूर

ध्येयवादी परिवारात आपले स्वागत. "बचत" तसे बघायला गेले तर एक छोटासा शब्द, पण ज्यांना-ज्यांना या छोट्या शब्दाचा मोठ्ठा अर्थ समजला त्यांचे जीवन बदलून गेले, असे बरेच उदाहरणं आपल्या अवती-भवती आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाने निश्चितच काहीनाकाही ध्येय त्याच्या आयुष्यात ठेवलेले असते आणि तो या ध्येयाचा पाठलाग करत असतो, ध्येयपूर्तीसाठी नक्कीच आर्थिक पाठबळ लागते आणि अशा ध्येयवादी सदस्यांबरोबर आम्ही उभे राहतो. आपले स्वप्न, ध्येय पूर्ण होवो यातच खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद मिळतो आणि अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. आपण केव्हाही आम्हाला भेटू शकता, अडचणी सांगू शकता, त्यावर मार्ग काढण्याकरिता आम्ही तुमच्या बरोबरीने प्रयत्न करू तसेच तुमची प्रगतीही आवर्जून सांगा कारण तुमच्या प्रगतीचा आनंद परिवारातील प्रत्येक सदस्याला आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला बचतीची सवय लावून आर्थिक प्रगती अन सर्वांगीण प्रगती घडून आणायची या उद्देशाने चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सुरुवात संस्थेचे संस्थापक चेअरमन मा.रोहित बोम्मावार यांनी केली. चंद्रपूर-गडचिरोली भागातील अनेक आदिवासी गावात संस्थेच्या शाखा आहेत व आधुनिक सेवा-सुविधा देत ग्राहकसेवेत स्वतःला वाहून घेत आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात १७+ शाखा असून ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आधार बँकिंग, SMS बँकिंग, मायक्रो ATM, कोअर बँकिंग इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. आधुनिक युगात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व जाणून घेऊन नेहमीच ग्राहकांना सेवा सुविधा उपलब्ध करून त्यांचा बँकिंग अनुभव सुलभ करण्यात संस्था आग्रही असते.

ग्राहकांच्या मनातील बँकिंग बद्दलची भीती काढून यामधील बारकावे, फायदे सांगण्याकरिता संस्थेच्या वतीने अनेक शिबिरे घेण्यात येतात. ज्याला बँकिंग म्हणजेच आर्थिक व्यवहार समजला त्याची भविष्यात आर्थिक अडचणी भेडसावत नाही आणि अगदी आल्याच तर त्यातून मार्ग काढणे सोपे जाते. जास्तीत जास्त लोकांना बचतीचे मार्ग तसेच विविध कर्ज योजना उपलब्ध करून देत चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेटचा परिवार दिवसेंदिवस विस्तारत आहे. हे सर्व करत असताना संस्थेमध्ये पारदर्शक व्यवहार, सहकार क्षेत्राचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

आमच्याशी संपर्क साधने खूप सोपं आहे.. पुढील फॉर्म भरून पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क साधू.
Logo